रावेर प्रतिनिधी । मुंबईत मूसळधार पाऊस पडत असल्याने आज रावेर रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एक्सप्रेस गाड्यांमधील प्रवाशांना तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी येथील रेल्वे स्टेशनवर केळी व पाणी वाटून त्यांना सहकार्य करण्यात आले आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, रेल्वे स्थानकावर अनेक तासांपासून गाड्या थांबुन आहेत. एक्सप्रेस गाड्यामध्ये पाणी नाही, प्रवासी यांना नास्ता नाही, याची माहिती मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी तात्काळ रेल्वे स्टेशनकडे धाव घेत प्रवाशांना फळे वाटण्यात आली तर अंबिका व्यायाम शाळाचे अध्यक्ष भास्कर महाजन यांनी पूर्ण टीमसह रावेर रेल्वे स्टेशन वर थांबलेल्या एक्सप्रेस गाड्यां मधील प्रवाशांना मोफत पाणी व केळीचे वाटप करण्यात आले आहे. तसेच यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. बारेला, दिपक नगरे, उपाध्यक्ष रविंद्र महाजन, भगवान चौधरी, संतोष पाटील व मिलिंद महाजन यांच्यासह आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.