रावेर तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

रावेर प्रतिनिधी । कोरोनाच्या महामारीत प्रशासनातर्फे उत्कृष्ट कामगीरी करत जनतेच्या मनात शासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यात प्रभावीपणे कामगिरी केल्याने रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

कोरोनाच्या महामारीत जिल्हाभरात प्रशासनाच्या योजना प्रभावी पणे अंबलात आणून जनहितासाठी विविध उपाय-योजना केल्या बद्दल तसेच कोरोना व्हायरस आटोक्यात आणणाऱ्‍या जिल्हाभरातील अधिका-यांचा प्रशिस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला यात रावेरच्या महिला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचा देखील सामावेश असून त्यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सन्मानपत्र देऊन त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

प्रशासनातर्फे अशी केली सेवा
तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लोकडाऊन काळात तालुक्यातील सुमारे आठ हजार गरजु कुटुंबाना किराणा किट्स दिले,शासना कडून देण्यात येणाऱ्या मोफत धान्य सर्वांन पर्यंत पोहचावे म्हणून पायाला चक्री लावून तालुक्यात फिरल्या कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी जनतेत प्रभावी प्रचार-प्रसार केला. लोकवर्गणीतुन रावेर कोविड सेंटरला सोलर हीटर व इतर सुविधा उपलब्ध केल्या रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर उभारले कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी मध्य प्रदेश सिमांवर विशेष लक्ष दिले शासना कडून येणाऱ्या आदेश ताबड-तोड लागू करून जनतेत शासना बद्दल विस्वास निर्माण करण्याचे काम तालुक्यात केल्याची दखल स्वता: जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतली व त्यांचा प्रशिस्तपत्र देऊन केली आहे.

Protected Content