रावेर, प्रतिनिधी | स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले असून तरी सुध्दा ग्रामस्थ उघड्यावर शौचसाठी जात असल्याने ग्रामपंचायत स्तरावर गुड मोर्निंग पथक तयार करून उघड्यावर शौच करण्यास मज्जाव करावे तसेच सांगुन सुध्दा न ऐकल्यास कारवाई करण्याच्या सूचना पंचायत समिती विभागाकडून करण्यात आल्या आहे.
याबाबत वृत्त असे की, ग्रामपंचायतस्तरावर शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांनी शौचालयाचा १०० % टक्के वापर करणे गरजेचे आहे. परंतु काही ग्रामस्थ अजूनही शौचालयाकरिता बाहेर जातात. अशा ग्रामस्थांना उघड्यावर शौचालयासाठी ग्रामपंचायतस्तरावर तसेच गावपातळीवर गुड मोर्निंग पथक तयार करून त्या पथकात स्वच्छताग्रही, महिलाबचत गट प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, युवक मंडळे, गावपातळीवर असलेले प्रतिष्ठीत नागरिक आदींचा पथकात समावेश करून एक गट निर्माण करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ५.३० ते ६.३० वाजे दरम्यान भेट देवून उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांना उघड्यावरील शौचालया बसु देऊ नये. त्यांनी बांधलेल्या शौचालयाचा वापर करावा अन्यथा त्यांचावर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ नुसार सार्वजनिक जागेत उघड्यावर शौचास बसने दंडनीय अपराधच्या कलमाच्या आधारे १२०० / – रुपये दंड व दंड भरल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा होणार आहे. तसेच गुड मोर्निंग पथक, पंचायत समितीस्तरावरून नियुक्त पथक केव्हाही भेट देवून पाहणी करणार असल्याही माहिती स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक समाधान निंभोरे, विस्तार अधिकारी सी. आर. महाले, हबीब तडवी, डी. एस. सोनवणे, मंजुश्री पवार,यांनी दिली आहे.