Home क्राईम रावेर महसूलतर्फे तीन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर ट्रक्टर-टॉलींवर कारवाई

रावेर महसूलतर्फे तीन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर ट्रक्टर-टॉलींवर कारवाई

0
36

रावेर प्रतिनिधी । रावेर महसूल विभागाने मागील चार दिवसात तीन अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रक्टर-ट्रॉलीवर कारवाई केली आहे. दरम्यान, ही कारवाई तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

रावेर महसूल विभागा कडून मिळालेल्या माहीती नुसार दि ४ रोजी सावदा वाघोदा रस्त्यावर खिरोदा व निंभोरा मंडळ आधिकाऱ्‍यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास अवैध वाळूचे बिनानंबर ट्रक्टर ट्रॉली जप्त केली आहे. तर दूसरे अवैध वाळूचे विनानंबर ट्रक्टर ट्रॉली दि ५ रोजी पहाटे छोरीया मार्केट येथे मंडळ अधिकारी विठोबा पाटील, सचिन पाटील, गणेश चौधरी यांनी ही कारवाई केली. तर तिसरे अवैध वाळूचे ट्रक्टर ट्रॉली दि. ७ रोजी सकाळी अकरा वाजता मंडळ अधिकारी खानापुर ऐनपुर मंडळ अधिकारी यांनी अटवाडा येथे कारवाई केली.

यातील दोन ट्रक्टर  ट्रॉलीला दंड भरण्याच्या नोटीसा कौशल चौधरी यांच्या कडून काढण्यात आल्या आहे. मागील चार दिवसात तहसिलदार उषाराणी देवगुणे निवासी नायब तहसिलदार सजंय तायडे यांच्या मार्गदर्शना खाली अवैध वाळु विरोधात कारवाईचा धड़ाका महसूल कडून राबविण्यात आला आहे.

 


Protected Content

Play sound