रावेर शिधापत्रिका पोर्टल महिन्यांपासून बंद; नागरिकांचे हाल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पुरवठा विभागाचे शिधापत्रिका पोर्टल अनेक महिन्यांपासून बंद असल्याने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेशन कार्डवरील नावे कमी करणे किंवा नवीन नावे वाढवण्यासाठी नागरिकांना अडथळे येत आहेत. या समस्येमुळे शासकीय कामे, विविध दाखल्यांसाठी अर्ज, तसेच रेशन कार्डशी संबंधित कार्ये पूर्ण करणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि नागरिकांना सततच्या चकरा माराव्या लागत आहेत. याशिवाय, अनेकांना शिधापत्रिका पोर्टल कार्यान्वित नसल्यामुळे रेशनवरील नावे अद्ययावत करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पोर्टल सुरू होण्यासाठी निश्चित वेळ दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. अनेक महत्त्वाच्या सेवांवर याचा परिणाम होत आहे. याबाबत स्थानिक नागरीकांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. आ. जावळे यांनी जनतेच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोर्टल लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिधापत्रिका पोर्टल सुरू झाल्यास नागरिकांची गैरसोय थांबेल आणि शासकीय कामांना गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.सरकारने या तांत्रिक समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही सर्वसामान्यांमधून होत आहे.

Protected Content