रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलीस स्टेशन हद्दीत मागील तीन वर्षांपासून नागरिकांचे मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यात रावेर पोलीसांनी चक्र फिरवत साडेतीन लाखांचे तब्बल ५० मोबाईलचा शोध लावण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे तांत्रिक विश्लेषणाची मदत घेऊन रावेर पोलिसांनी मागील तीन वर्षांपासून हरवलेले मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकाला परत दिले जाणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व मोबाईल शोधण्याचे काम पोकॉ सचिन घुगे यांनी केले आहे.
पालकमंत्रीच्या उपस्थीतीत मोबाईल वितरण
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलु केजो, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या हस्ते मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आले आहे.