रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पशुधनाला कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशय ट्रक येथील पाल गावानजिक रावेर पोलिसांनी पकडून तेरा गुरांना जीवन दान दिले आहे. या प्रकरणी तीन जणांविरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत वृत्त असे की, सोमवार, दि ९ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास कत्तलीच्या उद्दीष्टाने आयशय ट्रकमध्ये १ लाख ६० हजाराचे पंधरा पशुधन घेऊन जात असतांना पाल गावानजिक पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्यात निर्दयीपणे पशुधन वाहतूक करतांना आढळुन आले आहेत. यात दहा गाई व तीन जिवंत वासरू तर दोन वासरू मयत स्थितीत आढळून आले. या ट्रकमधील सर्व पशुधनानां गौशाळेत रवाना करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सहा लाखाचा आयशय ट्रक जप्त केला असून याबाबत प्रमोद कुमार छोटेलाल (रा कोटला यू पी) गुड्डू मुन्नेलाल खान ( रा नलामीकीनी जिल्हा येटा) अखिलेश सोदाशिह (रा गोदाऊ यू पी) यांच्या विरुध्द महाराष्ट्र पशु संरक्षण अंतर्गत रावेर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सह फौजदार महेबुब तडवी, पो.ना.कल्पेश अमोदकर करीत आहे.