रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात उघड्यावर गोमांस विक्री करीत आलेल्या ९ जणांवर रावेर पोलीसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात काहीजण गोमास कब्जात बाळगून उघड्यावर विक्री करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल मिळाल्याने त्यांनी कारवाई निर्देश दिले. सपोनि अंकुश जाधव आणि सहकाऱ्यांनी कुरेशी मोहल्ल्यात धाव घेतली आणि उघड्यावर गोमांसाची विक्री करणाऱ्यांवर धाड टाकून कारवाई केली. त्यांच्याकडून एकुण ५३ हजार ८०० रुपयांचे ३०० किलो गोमांस जप्त केले.
याबाबत महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कलीम खाँ हिरे खाँ, शेख चाँद शेख रेहमान, शेख लाल शेख कडु, शेख समीर शेख नसिर, शेख अल्तमश शेख अखतर, शेख अल्ताफ शेख गफ्फार कुरेशी, शेख लुकमान शेख बिस्मिल्ला कुरेश, शेख फरिद शेख रेहमान, सोहेल रफिक शेख गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.