रावेर प्रतिनिधी । पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ लिपिक सलीम तडवी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत.
याबाबत वृत्त असे की, रावेर पंचायत समिती कार्यालयात समाजकल्याण वरिष्ठ लिपिक म्हणून सेवारत असलेले सलीम तडवी हे सेवेत नेहमी कर्तव्यात कसूर करत असल्याच्या तक्रारी होत्या. विना परवानगीने सतत गैरहजर राहणे, समाजकल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देतांना कर्तव्या नेहमी कसूर करत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे पंचायत समितीच्या कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.