रावेर प्रतिनिधी । तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पंचनामे करण्याच्या सुचना रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिल्यात.
गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतातील ज्वारी, बाजरी, भुईमुंग, कापूस, मका यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेताची पाहणी करावी त्यानंतरच पंचनामा करावा, तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल त्यांनी आपली कागदपत्रे संबधित पंचनामा करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याकडे जमा करण्याचे अवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.