रावेर प्रतिनिधी । दिवाळीच्या पार्श्वभूमिवर प्रवाशांची संख्या जास्त प्रमाणात वाढल्यामुळे रावेर बस आगारातून उद्यापासून पुण्यासाठी अतिरिक्त बसेस पाठविण्यात येणार आहेत.
सध्या प्रवाशांची मागणी बघता रावेर बस स्थानकातुन उद्या पासून दररोज पुण्या साठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. तसेच इतर ठिकाणी देखील चार अधिकचे बस नियमित चालवणार असल्याचे आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला सांगितले.
कोरोना प्रभाव हळुहळु कमी होत चालला असून प्रवाशांची मागणी बघता रावेर आगारातून दरोरोज पुणे जाण्यासाठी एक बस ६ : ३० असेल तर दूसरी बस संध्याकाळी ७:३० ला असेल. ही बस पुणे वाकडेवाडी (वल्लभ नगर) पर्यंत असेल. तर रावेर तालुक्यातील पाल व तांदलवाडी तसेच मुक्ताईनगर अंतुर्लीसाठी देखील उद्या पासून नियमित बस सेवा सुरु होणार असल्याचे आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संदीपसिंह राजपूत यांनी बसफेर्या वाढविण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने आता आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.