रावेर शालीक महाजन । बोरखेडा येथे चार बालकांची केलेली हत्या ही अतिशय भयंकर या प्रकारातील असून या कुटुंबाला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री ना. के.सी. पाडवी यांनी दिली. आज पिडीत कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी आ. शिरीषदादा चौधरी यांची देखील उपस्थिती होती.
ना. के.सी. पाडवी यांनी आज रात्री बोरखेडा हत्याकांडातील पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ते म्हणाले की, अनेकदा वाद होतात, यातून खून देखील होतात. मात्र कोणतेही सबळ कारण असल्याविना चार बालकांचा केलेला खून हा अतिशय धक्कादायक असा प्रकार असून आपण आयुष्यात असला प्रकार पहिल्यांदाच पाहिला आहे. या गुन्ह्याचा मानसशास्त्रीय अभ्यास होणे देखील गरजेचे असल्याचे पाडवी म्हणाले.
ना. पाडवी पुढे म्हणाले की, राज्य शासनाने आधी जाहीर केल्यानुसार या कुटुंबाला सर्वतोपरी मदत मिळणार आहे.
खालील व्हिडीओत पहा ना. के.सी. पाडवी यांच्या भेटीचा वृत्तांत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/390529905397707