रावेर (प्रतिनिधी) । राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात गरजू रूग्णांना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, पं.स. सदस्य दिपक पाटील, युवक उपाध्यक्ष चेतन पाटील, युवक शहराध्यक्ष असलम शेख, युवक अध्यक्ष अजंदे महेंद्र पाटील, सोनू पाटील, डॉ.स्वप्निशा पाटील, प्रियंका बोंडे यांच्यासह राष्ट्रीवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रामीण रुग्णालयाच्या फळ वाटपाकडे दुर्लक्ष
“राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून घेणारे पदाधिकारी रावेर तालुक्यात खुप आहे. परंतु त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुणालयाच्या फळवाटपाकडे यांचे दुर्लक्ष झाले. यामुळे उपस्थितांमधून नाराजीचा सुर उमटत होता”