रावेर प्रतिनिधी । रावेर नगरपालिके तर्फे शहरातील दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्यच्या माध्यमातुन मदत करण्यात आली. शहरातील १६१ अपंग बांधवांना पालिकेतर्फे तब्बल ३ लाख ५८ हजार ५०० रुपये संबधित दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी दिली.
रावेर शहरातील १६१ अपंग बांधवांना २०२०/२१ वर्षाची पालिकेने तरतूद केलेली ३ लाख ५८ हजार ५०० रुपयाची रक्कम आज रावेर शहरातील दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. सदर रक्कम शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे दिव्यांग लाभार्थी यांच्या उदारनिर्वाहसाठी अपंगत्वाच्या प्रमाणानुसार प्रदान करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. सदर प्रक्रिया एनयुएलएम चे काम पाहणारे निलेश महाजन यांनी पुर्ण केली आहे.