रावेर, प्रतिनिधी। रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवर्षीक निवडणुकीची येत्या मुदत २० सप्टेंबर रोजी संपत आहे.त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळते की प्रशासक बसते या सहकार विभागाच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
केळीचे आगार म्हणून रावेर तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला देखित तितकेच महत्व आहे. परंतु, कोरोनाचा पादुर्भाव आणि कृषी उपन्न बाजार समिती संपत असलेली मुदत लक्षात घेता बाजार समितला मुदतवाढ मिळते की प्रशासक बसते या सहकार विभागाच्या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
१८ संचालकांची या मतदारसंघातुन होते निवड
रावेर कृषी उपन्न बाजार समितीला विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात ११ संचालक, ग्राम पंचायत मतदार संघ ४ संचालक, हमाल मापाडी मतदारसंघ १ संचालक, तर व्यापारी मतदार संघ २ संचालक अश्या १८ विविध संचालकांसाठी निवडणूक घेतली जाते. यांची मुदत येत्या २० सप्टेंबर रोजी संपत आहे.
बाजार समितीला मिळाले पाच वर्षात सहा चेअरमन
रावेर कृषी उपन्न बाजार समितीने मागील पाच वर्षात सहा चेअरमन कार्यकाळ अनुभवले आहे यामध्ये सुरुवातीला भाजपाचे पितांबर पाटील,कॉग्रेस डॉ राजेंद्र पाटील,राष्ट्रवादी निळकंठ चौधरी तर विद्यमान भाजपा श्रीकांत महाजन यांना प्रत्येकी एक वर्ष मिळाले आहे तर राजिव पाटील व डी सी पाटील कॉग्रेस यांनी सहा महीन्यांचा कार्यकाळ अनुभवला आहे.
इतर ठिकाणी मिळाली आहे मुदतवाढ
कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील ५२ सहकारी संस्थाना येणाऱ्या १७ सप्टेंबर पर्यंत सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे. या संस्था निवडणुकीस पात्र असतांना सहकार विभागाने दिलेली मुदतवाढ बघता बाजार समितीला देखील मुदत वाढ मिळन्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान रावेर बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन यांनी सांगितले की, विद्यमान संचालकांना मुदतवाढ द्यावी की प्रशासक बसवावे याची सर्वस्व जबाबदारी सहकार विभागाची असून सहकार विभागा कडून घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल.