Home Cities रावेर ‘त्या’ महसूल अधिकार्‍याची प्रांतधिकारी करणार चौकशी

‘त्या’ महसूल अधिकार्‍याची प्रांतधिकारी करणार चौकशी

0
28

रावेर प्रतिनिधी । अवैध गौण-खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर-टॉली पकडून तोड-पाणी करून सोडून देणार्‍या ‘त्या’ अधिकार्‍याची प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात चौकशी सुरु असलेल्याचे लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले

या बाबत वृत्त असे की या आठवड्याच्या सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अवैध गौण खनिजचे टॅक्टर-टॉली पकडून एका महसूल अधिकार्‍याने ओंकारेश्‍वर (ता रावेर) नजिक पकडले व थेट मालकाशी बोलून कर्तव्यात कसूर करून शासनाचा महसूल बुडवून सोडून दिले.

या घटनेची प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी गंभीर दखल घेतली असून त्या अधिकार्‍याची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound