Home धर्म-समाज हबीब तडवी यांचा प्रभारी पदभार काढला : आता पूर्णवेळ...

हबीब तडवी यांचा प्रभारी पदभार काढला : आता पूर्णवेळ यावलच

0
61

रावेर, प्रतिनिधी । प्रभारी विस्तार अधिकारी हबीब तडवी यांचा रावेरचा पदभार जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज काढला आहे. तसेच त्यांना यावल पंचायत समितीत पूर्ण वेळ काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पाच महिन्यांपूर्वी रावेर वरुन बदली झालेले हबीब तडवी यांना पुन्हा रावेर पंचायत समितीत प्रभारी विस्तार अधिकारी म्हणुन तीन दिवसाचा चार्ज दिला होता. जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी देखिल नाराजी व्यक्त करून हा पदभार काढण्याचा सूचना केल्या होत्या. दरम्यान आज जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रावेर पंचायत समितीचा अतिरीक्त पदभार काढून यावल पंचायत समितीत पूर्ण वेळ काम करण्याचा सूचना वजा आदेश बजावला आहे.


Protected Content

Play sound