रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातील श्रीराम पेट्रोलियम येथील पेट्रोल पंपावर स्टिलच्या आरओ मशीनवर थंड पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय युवकाचा शॉक लागून दुदैवी मृत्यु झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या बाबत वृत्त असे की रावेर शहरातील मयत धृव कुशवाह राहणार- (सुजातपुर.जि.भिंड) हा युवक अनेक वर्षा पासुन श्रीराम पेट्रोलियम समोर गाडी लाऊन पाणीपूरी विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होता. रविवारी सायंकाळी श्रीराम पेट्रोलियम येथे थंड पाणी देणार्या आरओ मशीनवर पाणी पिण्यासाठी गेला होता. या मशीनला हात लावताच धृव याला विजेचा धक्का लागल्याने तो खाली कोसळला.
दरम्यान, लागलीच आजु-बाजूला असलेल्या नागरीकांची गर्दी जमा झाली आणि धृव कुशवाह याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ विरेंद्र काटकर यांनी धृव याला तपासले असता. त्याला मृत घोषीत करण्यात आले.मयत धृव याची घरची स्थिती अत्यंत हलाकिची असून त्याला आई-वडील व गर्भवती पत्नी असा परीवार आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.