Home क्राईम रावेर आगारातील दोन वाहकांचे कार्यमुक्तचे आदेश; महामंडळात खळबळ

रावेर आगारातील दोन वाहकांचे कार्यमुक्तचे आदेश; महामंडळात खळबळ


ST Bus 1491275713199

रावेर प्रतिनिधी । बस आगारातील दोन वाहक कर्मचाऱ्यांचे कार्यमुक्तचे आदेश आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी काढला आहे.  दोन्ही कर्मचाऱ्यांचे कामात कचुराई दिसून आल्याने सेवानिवृत्तीचे आदेश काढले आहे. या आदेशामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, आगारात आर.पी. गाढे आणि एस.पी. पवार हे वाहक या पदावर कार्यरत होते. मात्र ते नेहमी एस.टी. महामंडळाची प्रतिमा समाजात खराब होईल, असे वर्तन करीत होते. त्यांच्या कामात व वर्तुनुकीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करीत त्यांची सेवा समाप्त करण्याचा प्रस्ताव विभागीय नियंत्रकांकडे पाठविला होता. त्यानुसार या दोन्ही वाहकांच्या सेवा समाप्त करण्याबाबतचा अभिप्राय आगार व्यवस्थापक यांना पाठविल्याने वाहक आर.पी. गाढे व एस.पी.पवार या दोन्ही वाहक कर्मचाऱ्यांच्या सेवा आगार व्यवस्थापक श्री बेंडकुळे यांनी काढले आहे.


Protected Content

Play sound