बांगलादेश हिंसाचाराच्या निषेधार्थ १६ ऑगस्ट रोजी रावेर बंद

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बांगलादेश येथे हिंदू समाजावर टार्गेट करून होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ रावेर शहरातील सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद पुकारला आहे. १६ ऑगस्ट, शुक्रवारी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहतील आणि नागरिकांनी निषेध नोंदविण्यात येणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदू युवकांनी या संदर्भात तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन व नगर पालिकेला निवेदन दिले आहे. बांगलादेशात होत असलेल्या हिंसा आणि मंदिरांच्या तोडफोडीच्या घटनांचा निषेध करत, रावेर शहरातील हिंदू समाजाने एकत्र येऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

Protected Content