रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिले आहेत. त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी याबाबत मागणी केली असून, या जागेसाठी गटाकडे योग्य उमेदवार देखील आहे.
रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत प्रमोद पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार अरूण पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन, शहराध्यक्ष महमूद शेख, माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, प्रविण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाटील यांनी रावेर विधानसभा मतदारसंघावर पक्षाची भक्कम पकड असून, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट हे मैदानात उतरणार असल्याची घोषणाही यावेळी केली.