रावेर (प्रतिनिधी) आगामी निवडणुकीत रावेर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून अनेक दिग्गज इच्छुक असून पक्षाने तिकीट न दिल्यास अपक्ष राहण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे मतदार राजा आपला जनादेश कोणाच्या बाजूने देतो याबाबत उत्सुकता वाढली असून आगामी निवडणुकीत राष्ट्रीय पक्षासह अपक्ष उमेदवार चांगलीच रंग भरणार आहे.
रावेर विधानसभेचे 2009 मध्ये पुर्नरचना होऊन रावेर-यावल विधासभा मतदार संघ तयार झाला होता. तेव्हा पासून या मतदार संघावर लेवापाटील समाजाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघात सर्वात मोठा समाज लेवा पाटील असून त्यानंतर मराठा,मुस्लिम,बुध्दिष्ट समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे या समाजांवर इच्छुक उमेदवारांनी डोळा ठेवून विजयाची रनणीती तयार करण्यात लागले आहेत. प्रत्येक टर्मला नवीन आमदार या मतदारसंघातील जनतेने निवडून दिला आहे. आतापर्यत एकाही आमदाच्या कामांवर खुश होऊन मतदार राजाने मागील 35 वर्षा पासून कोणालाही पुन्हा संधी दिली नसल्याचा इतिहास आहे. परंतू विद्यमान आ.हरिभाऊ जावळे हे आपल्या विकास कामांच्या जोरावर आपण हा इतिहास खोडून काढू, असा आशावाद ठेवून आहेत.
रावेरमधून आजच्या घडीला भाजपा कडून विद्यमान आ हरिभाऊ जावळे, अॅड. रोहिणीताई खडसे,अनिल चौधरी,अतुल पाटील(यावल)डॉ संदीप पाटील, डॉ कुंदन फेगडे,भरत महाजन, पद्माकर महाजन, ही मंडळी भाजपा कडून इच्छुक आहे. तर माजी आ.शिरीष चौधरी,शरद महाजन,दारा मोहोम्मद कॉग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. दुसरीकडे प्रल्हाद महाजन प्रविण पंडित हे शिवसेनेतर्फे इच्छुक असून विवेक ठाकरे हे वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहे.
रावेर विधासभा मतदार संघात सर्वात मोठा लेवापाटील समाज अस्यून त्यानंतर मराठा समाज आहे. भाजपा व आ हरीभाऊ जावळे यांच्याकडे पहिल्या फळीत काम करणारा एकही मराठा समाजाचा पुढारी नाहीय. याचा फटका त्यांना बसून शकतो. शेवटी-शेवटी मराठा समाजा मुलांचा वस्तिगृहाचा आवाज विधानसभेत उचलून या समाजाला खुश करण्याचा प्रर्यत्न त्यांनी केला. परंतू याला किती यश येते? हे औत्सुक्याचे ठरणार आहे. कॉग्रेसची देखिल हीच स्थिती आहे. तर चार तुल्यबळ अपक्ष उमेदवारही रिंगणात असल्यामुळे निवडणूक जोरदार रंगतदार होणार आहे.