मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना खासदार संजय राऊतांनी आजच्या शपथविधी सोहळ्याला दांडी मारली. संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची चर्चा असून आज त्यांचा अनुपस्थीत मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. तर दुसरीकडे आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, ते शपथविधीसाठी उपस्थित राहीले नाहीत. सरकार स्थापन करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका निभवली आहे. मी किंवा माझे कुटुंबीय नाराज नाही. आम्ही आयुष्यभर पक्षासाठी काम करणार आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले. अनुभवी आणि हुशार नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे. हे सर्व मंत्री चांगले काम करुन राज्याला नवी दिशा देतील, असे संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले