Home राजकीय भाजपच्या हातात काय आले ? : राऊत यांचा सवाल

भाजपच्या हातात काय आले ? : राऊत यांचा सवाल

0
33

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । ”देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘राईट हँड मॅन’ असून हे दोन्ही मान्यवर राज्याला पुढे घेऊन जातील” अशी अपेक्षा खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केली आहे. तर हा सर्व खटाटोप करून भाजपच्या हातात काय आले ? असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

काल रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर संजय राऊत यांनी आज सकाळ पत्रकारांशी बोलतांना याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही अनुभवी नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल अशी अपेक्षा आहे. यासाठी त्यांना शुभेच्छा देखील त्यांनी व्यक्त केल्या. फडणवीस हे शिंदे यांचे राईट हँड असल्याचा उल्लेख देखील त्यांनी याप्रसंगी केला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना फोडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केले. आज एकनाथ शिंदे यांना जे मुख्यमंत्रीपद मिळाले ते केवळ शिवसैनिक असल्यामुळेच मिळालेले आहे. अन्यथा, आधी अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपद मिळाल्याची बाब लक्षणीय असल्याचे ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षांपासून भारतीय जनता पक्ष सरकार पाडण्याचे प्रयत्न केले असतांना त्यांना आता यश मिळाले आहे. तथापि, त्यांच्या हातात काय लागले ? असा सवाल देखील त्यांनी केला. त्यांना सरकारमध्ये दुय्यम भूमिका स्वीकारावी लागल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले.


Protected Content

Play sound