जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा भागातील रेशन दुकान क्रमांक ३८/१ या दुकानदाराने लाभार्थ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून रेशन दिले नसल्यामुळे लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांना निवेदन देवून दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी केले आहे.
प्रतिभा शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील तांबापुर येथील लोकवस्तीत अनेक गरीब व गरजू लोक राहतात. त्यातील अनेक लोक हातावर काम करून पोटभरून आपले जीवन व्यतीत करतात. अशा वेळी तांबापुरा परिसरातील दुकान क्रमांक 38/1 या दुकानदाराने जून 2021 व जुलै 2021 महिन्याचे रेशन धान्य अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना धान्य वाटप केले नाही. हा शिधापत्रिकाधारकांनावर अन्याय आहे. कोरोनाच्या काळात अनेकांची कामे गेली. लोकांना मजुरी नाही आणि दुसऱ्या बाजूला धान्य रेशन मिळत नाही ही गोष्ट अत्यंत अन्यायकारक आहे. यातील अनेक लाभार्थी विधवा व एकल महिला आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तातडीने दखल घेत रेशन न देणारा दुकानदारावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी व गोरगरीब जनतेला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, कैलास मोरे, जगन मालचे, मंगला सोनवणे, कल्पना गायकवाड, संगीता मोरे, सुरेश बोरसे, लताबाई बोरसे, हिरामण मोरे, बाबू सोनवणे, सोनू मालचे, शंकर बोरसे, तुळशीराम मोरे, कमलबाई गायकवाड, आशा सोनवणे, देवकीबाई ठाकरे, शेवंता मालचे, लक्ष्मण ठाकरे, सुनील ठाकरे, महारू मोरे, शोभा सोनवणे, सुमन कडवे, सेवंता मालचे यांच्यासह आदी लाभार्थ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.