मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टाटा समूहाचे चेअरमन तथा ख्यातनाम उ द्योजक रतन टाटा यांचे निधन झाले असून या माध्यमातून एक मोठे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
बुधवारी, भारतातील सर्वात मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांना गंभीर अवस्थेत मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. बुधवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत.
याआधी सोमवारीही रतन टाटा यांची प्रकृती खालावल्याची बातमी आली होती, मात्र रतन टाटा यांनीच काही वेळा या वृत्ताचे खंडन केले होते. त्यांनी जनतेला आणि माध्यमांना चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहण्याची विनंती केली आणि काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. मी ठीक आहे! मुंबईतील रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या अफवा असल्याचे सांगत ८६ वर्षीय टाटा यांनी हे दावे निराधार असल्याचे म्हटले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रमुख व्यक्तींनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना एक दूरदर्शी व्यापारी नेते आणि एक असाधारण माणूस म्हणून संबोधले. ते ‘X’ वर म्हणाले, “श्री रतन टाटाजींचा सर्वात अनोखा पैलू म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आणि इतरांना परत देण्याची त्यांची आवड. “शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण या विषयांचा पाठपुरावा करण्यात ते आघाडीवर होते.”
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “एक मौल्यवान रत्न आता राहिले नाही. भारताचा कोहिनूर राहिला नाही, तो आपल्यापासून वेगळा झाला. रतन टाटा आता आपल्यात नाहीत, हे आपल्यासाठी दुःखद आहे. ते महाराष्ट्राची आणि भारत देशाची शान होते… त्यांना पाहून लोकांमध्ये ऊर्जा आणि प्रेरणा आली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यांना पुरस्कार देऊन पुरस्काराचे मूल्य वाढले… लाखो-कोटी लोकांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले.
दरम्यान, राज्य सरकारने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून सायंकाळी टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.