मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला आता रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. व्यवसाय, उद्योग, शिक्षण, रिअल इस्टेट, पर्यटन, वित्तीय सेवा, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी, बँकिंग या क्षेत्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला होता. त्यानंतर पहिलाच पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला होता.
मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे, त्यालाही रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. नवीन उद्योग भवन हे ७०० कोटी रुपयांच्या खर्चातून उभे राहत आहे. टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने गेल्या वर्षीच घेतला होता. हा पुरस्कार सरकारच्या वतीने टाटा यांना देण्यात आला. हा पुरस्कार प्रथमच दिला गेला होता.