रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अंकलेश्वर-बर्हाणपूर चौपदरी महामार्ग रावेर मार्गेच झाला पाहीजे यासाठी नागरीकांनी रास्तारोको आंदोलन केले.यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्या बद्दल नागरीकांनी प्रचंड रोष व्यक्त केला.खासदार यांनी रावेर तालुक्यात कोणतीच विकास कामे केलीच नाही.उलट मुळमहामार्ग बदलवुन मुक्ताईनगर तालुक्यात वळविल्याने उपस्थित नागरीकांनी रोष व्यक्त करत रास्तारोकोमध्ये जोरदार निर्दशनही केले.
रावेर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे येथे दुपारी बारा वाजता महामार्गावर महामार्ग बचाव सिमिती मार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्या विरुध्द जोरदार घोषणा देण्यात आला.सुमारे एक तासाच्या वर महामार्ग रोखुन धरला होता.तालुक्यात कोणतेच विकास कामे श्रीमती खडसे यांनी केले नाही.रावेर तालुक्यातुन मुळमार्गाने जाणारा महामार्ग वळवुन मुक्ताई नगर तालुक्यात नेला म्हणून रोष व्यक्त करण्यात आला. तसेच महामार्गावर पडलेले खड्डे निकृष्ट पध्दतीने बुजवण्यात आले असून एका महीन्यात पुन्हा खड्डे पडल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.अखेर न्हाईचे अधिकारी चंदन गायकवाड आंदोलनस्थळी येऊन महामार्ग मुळमार्गानेच जाण्यासाठी प्रर्यत्न करणार असल्याचे सांगितल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.