बुरहानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाचे “रास्तारोको” आंदोलन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र मिळावे, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाने शासकीय विश्रामगृहाजवळ बुरहानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे एक तास आंदोलन केले.

धनगर आणि धनगड हे एकच असल्याने, केंद्र आणि राज्य सरकारने याची दखल घेऊन देशभरात धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना देण्यात आले.

Protected Content