भुसावळ प्रतिनिधी । येथील साकरी नॅशनल हायवेवर डबरची मोठ्या प्रमाणात ओव्हर लोड वाहतुक होत असल्यामुळे रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्ताचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अन्यथा सर्व नागरीक विद्यार्थ्यांसह दि. १० ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा देत, तहसील अधिका-यांना आज निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, या रस्त्याने इंदीरानगर येथील जवळ जवळ ५० ते ५६ लहान मुले जि. प्राथमिक शाळेत तसेच हायस्कुल मध्ये येत असतात. तसेच साकरी येथील विद्यार्थी किन्ही येथे शिक्षणासाठी ये-जा करत असतात. किन्ही व साकरी येथुन संत गाडेगाबाबा कॉलेजला विद्यार्थी जात येत असतात. परंतु रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे मुले शाळा व कॉलेजला जाऊ शकत नाही, काल इ. १ लीत शिकणारी मुलगी या रस्त्याने जात असतांना पडली, तिचा हात फ्रेक्चर झाला. नॅशनल हायवेच्या ठेकेदाराला हे रस्ते तयार करण्याचे बंधनकारक असून सर्व रस्ते इतके खराब करून ठेवले आहे की, या रस्त्याने पायी चालणे, मोटारसायकल किंवा रिक्षा चालविणे ही शक्य नाही.
तसेच निवेदनात म्हटले आहे की, जो पर्यंत हा रस्ता नॅशनल हायवेचे ठेकेदार करून देत नाही तो पर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही. येथील वस्तीत सर्व मजुर दर्गाचे वास्तव्य करीत असुन मुलांच्या होणा-या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी संबंधीत ठेकेदार व प्रशासनावर राहील या रस्त्याचे काम त्वरीत ठेकेदाराला आदेश देऊन होणारे नुकसान टाळावे अन्यथा सर्व नागरीक विद्यार्थ्यांसहीत दि. १० ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.