जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर मतदार संघातून राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी सोमवारी सायंकाळी प्रचार दरम्यान पिंप्राळा परीसरातील नागरीकांशी संवाद समस्यांबाबत साधला. यावेळी आपण मला संधी दिल्यावर आपले मुलभूत प्रश्नांसोबतच सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे, त्यांना आश्वत केले.
विधानसभा निवडणुक आणि नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने जळगाव शहरातील विविध भागांना भेटीगाठी देत असताना अभिषेक पाटील यांना नागरिक आणि युवकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. तसेच अनेक वर्षांच्या सत्तेनंतर सुद्धा लोकप्रतिनिधी याभागातील पाणी आणि रस्ता सारख्या मुलभूत प्रश्न सोडवू शकले नाहीत, हे त्यांच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे. मुलभूत सुविधांच्या अभावाने स्थानिक नागरिक देखील या त्रस्त झाल्याचे मनातून संतप्त भावना निर्माण होत होत्या. यावेळी आपण मला संधी दिल्यावर आपले मुलभूत प्रश्नांसोबतच सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन अभिषेक पाटील यांनी दिले.