Home Cities चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसची जळगावात आढावा बैठक !

राष्ट्रवादी काँग्रेसची जळगावात आढावा बैठक !

0
29
congress
congress

congress

चोपडा प्रतिनिधी । । राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात संघटनात्मक आढावा बैठका सुरु आहेत. त्यानुसार जळगावला दि. 10 जुलै रोजी पक्षाची संघटनात्मक व बूथ कमेटीच्या आढाव्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.

 

यासंदर्भात माहिती अशी की, दि. 10 जुलै सकाळी 10 वाजता पक्ष कार्यालयातील बैठकीमध्ये पक्षाची संघटनात्मक वाटचाल व बूथ कमेटीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच काही सूचना देण्यात येणार आहेत. या आढावा बैठकिला जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यकारिणीच्या सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, तालुका कार्यकारिणीचे सर्व सदस्य, जि.प.गट प्रमुख, तसेच पंचायत समिती गण अध्यक्ष व कार्यकारिणी, ग्राम अध्यक्ष, तसेच सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस (ग्रामीण) तर्फे करण्यात आले आहे. बैठकीस राज्याचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आणि जिल्हा प्रभारी उपस्थित असतील. संघटनात्मक आढावा बैठकीस राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सर्व तालुकाध्यक्षांनी येताना आपापल्या क्षेत्रातील कार्यकारिणी कार्याचा आढावा व अहवाल सादर करायचा आहे, अशी विनंती जिल्हाध्यक्ष ललित बागुल यांनी केली आहे.


Protected Content

Play sound