राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची २८ जूनला बैठक

party11

पाचोरा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होणारी बैठक (दि. २८ जून) शुक्रवार रोजी दु. २ वाजता प्रसाद मंगल कार्यालय, भडगांव रोड, येथील बैठक सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात दु.४ वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे.

याबाबत माहिती अशी की, मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे मार्गदर्शन करणार आहे. नुकत्याच झालेल्या जळगांव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा आढावा घेणे, आगामी विधानसभा २०१९ बाबत बुध कमेटया याविषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पं.स.सदस्य, नगरसेवक,मार्केट कमिटी सदस्य, शेतकरी संघ सदस्य, युवक, युवती, महिला, किसान सेल,मागास सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी. सेल सदस्य शाखांचे प्रमुखांनी उपस्थित रहावे. अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आली आहे.

Protected Content