चोपडा प्रतिनिधी । महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास विभागाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.
या कार्याक्रमाचा सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तसेच इतिहास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या स्वातंत्र्याचे सुवर्णपान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भित्तीपत्रक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हे भित्तिपत्रक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कामिनी पाटील हिने तयार केलेले होते.
कार्याक्रमावेळी यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी हर्षल शिंपी, मगन भिलाला व तेजस्विनी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य स्पष्ट केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राष्ट्रसंतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याचे व प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
परिसरात यांनी केली स्वच्छता
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी कृतीयुक्त सहभाग घेत प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आपले योगदान दिले.
प्रमुख पाहुणे
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.के.एन. सोनवणे, मराठी विभागाच्या एम.टी. शिंदे व इतिहास विभाग प्रमुख एस.बी.पाटील उपस्थित होते.
यांनी केले सहकार्य
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जोशी तर आभार पूजा बाविस्कर या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.आर.आर.पाटील, एम.एल.भुसारे, बी.बी.पवार, एस.एम.पाटील, जी.बी.बडगुजर, एस.एन राजपूत, पी.एन.पूंनासे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.