रामटेक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अखेर उमेदवारी अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांनी अर्ज बाद ठरवला आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीत अपात्र झाल्यामुळे रश्मी बर्वे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
रामटेकची लोकसभा मतदारसंघाची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसने दिलेल्या दुसऱ्या उमेदवारांचा अर्ज मात्र पात्र ठरला आहे. त्यामुळे रामटेकमध्ये आता काँग्रेसचा उमेदवार बदलला आहे. हा दुसरा अर्ज त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी भरला होता. त्यामुळे श्यामकुमार बर्वे हे आता काँग्रेसचे रामटेक मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार आहे. त्यांचा सामना काँग्रेसमधून शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले उमरेडचे माजी आमदार राजू पारवे यांच्यासोबत होणार आहे. ही जागा वंचित बहूजन आघाडीने काँग्रेससाठी सोडली आहे. त्यामुळे रामटेकमध्ये शिवेसेना शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे.