यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथे अत्यंत घातक व वेगाने प्रसार होणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर आज दहिगावातील मुख्य चौकात सरपंच अजय अडकमोल व उपसरपंच किशोर महाजन यांनी पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करत ५२ नागरिकांची कोरोना ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली.
यामुळे कोणतेही कारण नसता गावात बेशिस्त विनाकारण व विना मास्क फिरणाऱ्याच्या गोटात खळबळ उडाली असून मोठा वचक बसणार आहे. दहिगाव चे जबाबदार व कर्तव्याची जाणीव सरपंच अजय अडकमोल व उपसरपंच किशोर महाजन यांनी हे नियोजन करून या अगोदर गावातील पाटील वाडा येथे तपासणी कॅम्प लावून ४२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात एक ज्येष्ठ नागरिक पॉझिटिव्ह मिळून आले होते.
आज घेण्यात आलेल्या ५२ कोरोना रॅपिड एंटीजन चाचणीत सर्व अहवाल निगेटिव्ह मिळून आले ही समाधानाची बाब आहे.कोरोना एंटीजन चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी , राजेंद्र बारी यांच्या पथकाने केली. ह्या कामी गावातील आशा सेविका नीता महाजन, भाग्यश्री महाजन ,पुष्पा पाटील व संध्या बाविस्कर , तसेच ग्रामपंचायतचे रवींद्र पाटील , विजयकुमार पाटील ,रितेश महाजन , नितीन जैन व सुधाकर पाटील आदींचे सहकार्य लाभले.