जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ पायी जात असलेल्या तरूणीचा विनयभंग केल्याबाबतची घटना मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २१ तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्या योग शिक्षिका म्हणून काम करतात. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ पायी जात होत्या. त्यावेळी संशयित आरोपी निखील सुरेश पाटील रा. खोटेनगर, जळगाव हा दुचाकीने येवून तरूणीचा पाठलाग केला. त्यानंतर तरूणीजवळ येवून त्याने तरूणीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. तसेच तरूणीला अश्लिल शिवीगळ करून धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने रात्री १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी निखील पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण करीत आहे.