भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह भडगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्याला आहे. १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना संशयित आरोपी पुटीया जुबनसिंह बारेला रा. डोंगलया पानी वरला जि.बडवाणी मध्यप्रदेश याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच जास्त आरडाओरड केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पुटीया जुबनसिंह बारेला रा. डोंगलया पानी वरला जि.बडवाणी मध्यप्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे हे करीत आहे.




