शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील लिहा येथील तरूणाने एका तरूणीला धमकावून तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिहा ता. जामनेर येथील बबलू उर्फ अतुल राजाराम चव्हाण वय २० या युवका विरोधात घरी बोलावून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल व समाजात बदनामी करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पहुर पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नंबर २०२१ भा.दं.वी.३७६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपीने फिर्यादीचे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले व बदनामी करून जीवेेमारण्याची धमकी दिली म्हणून पीडितेने दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक उप पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे करत आहेत