Home क्राईम रावेर येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग

रावेर येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग

0
70

रावेर – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना रावेर शहरात घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या वडीलांना प्रकरण मिटवण्यासाठी पंधरा लाख रुपयाची मागणी आरोपींनी केली या प्रकरणी तिघांविरुध्द गुन्हाची नोंद रावेर पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

या बाबत वृत्त असे की, “आरोपी जयेश मोतीलाल सपकाळे (रा.आर्दश नगर) याने २०१९ ते २०२० दरम्यान एका अल्पवयीन मूलीचा पाठलाग करून ‘माझ्याशी प्रेम कर’ अशी मागणी केली तर आरोपीचे जोडीदार गणेश विश्वनाथ भावसार व अमोल इंगळे यांनी या प्रकरणी १५ मार्च २०२२ रोजी ‘आम्हाला पंधरा लाख रुपये द्या नाही तर तुमच्या मूलीची बदनामी करू.’ अशी धमकी दिली म्हणून पीडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या बाबतचा तपास पोलीस उप निरीक्षक दिपाली पाटील या करीत आहेत.

 


Protected Content

Play sound