यावल प्रतिनिधी । यावल तालुका कृषी विभाग आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने पंचायत समितीच्या आवारात आज शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, जिल्हा परिषदच्या सदस्या सविता भालेराव, गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील, जळगाव जिल्हा सरपंच परिषदचे अध्यक्ष पुरुजीत चौधरी, भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, डी.पी. कोते यांच्यासह रानभाजीचे वेगवेगळे नमुने आणलेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रविण परतणे, तुषार परतणे (भालोद ), अजीत नरसिंग बारेला ( वाघझीरा ), विनायक उर्खड्ड सोनवणे (मनवेल ) , जितेन्द्र रमेश सोळुंके ( शिरागड ) , व्ही.डी. शिंदे ( कृषी सहाय्यक ), एच.पी. चौधरी ( कृषी सहाय्यक) कृषी सेवक के.पी. बारेला, सुजाता राजेंद्र कंकाळ, गोवर्धन नारायण बऱ्हाटे , एच.एस. कोल्हे, विमलबाई भागवत पवार, नसीम अरमान तडवी यांनी या महोत्वसवात सहभाग घेत विविध प्रकारच्या सुमारे शंभर रानभाज्या या ठीकाणी आणल्या होत्या. यात चाकवन, अंबाळी , कुंदरू, अळुयाने, गंगाफळ व चवई, कटले, चिव्यय, पोथीची पाने, बांबुकंद, रानअळु, शेवगा, अभय शेंग, हातग्याचे फुल, दिंडा भाजी, कर्टूले, चाकवत इत्यादी रानभाज्या या महोत्वासवात नागरीकांच्या व शेतकऱ्यांच्या माहीती व प्रर्दशनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव रानभाजी हे मानवी जिवनास व आरोग्यास किती गुणी व उपयुक्त आहे याची माहीती यावेळी उपस्थितांना सांगीतली.