मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | हनुमान चालीसा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या राणा दाम्पत्यासं काही अटींवर जामीन देण्यात आला होता. याची मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होती. या सुनावणीस राणा दाम्पत्य अनुपस्थित होते. त्यामुळे पुढील तारखेस सुनावणी घेण्यात आहे.
हनुमान चालीसा वादावरून खा.नवनीत राणा आणि आ. रवि राणा यांना जामीन देण्यात आला होता. त्यानंतर लीलावती रुग्णालयात दाखल असतांनाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरेयांच्या विरोधात हनुमान चालीसा पठन करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून न्यायालयाच्या अटी शर्तींचा भंग केल्यावरून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी सरकारतर्फे वकील प्रदीप घरत यांनी केली होती. या अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात राणा दांपत्याविरोधात सुनावणी होती.
या सुनावणीस संसदेतील महत्वाच्या बैठकीस हजर असून तब्बेत बरी नसल्याने रवि राणा देखील सोबत बैठकीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सुनावणीस हजर राहू शकले नाहीत. तसेच हनुमान चालीसा वाचण्याचा गुन्हा असून हनुमान चालीसा वाचण्यावर कोणतेही न्यायालय बंदी आणू शकत नाही. असे राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी न्यायालयात सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने एका कलमाला स्थगिती दिली आहे. परंतु त्याची प्रतच देण्यात आलेली नाही. त्यामुळे राणा दाम्पत्याने अर्थात आरोपींनी अटी शर्तींचे उल्लंघन केल्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचा काहीही संबंध नाही. राजद्रोह कलम स्थगित केले असले तरी आरोपींवरील अन्य कलमाखाली असलेल्या गुन्ह्याची सुनावणी सुरु रहाणार आहे. जर न्यायालयात जामीन अटी शर्तींचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाले तर राणा दाम्पत्याला पुन्हा कोठडीत जावे लागेल. त्यांना या तारखेस सवलत मिळाली असली तरी पुढच्या सुनावणीस मात्र हजर राहवेच लागणार असल्याचे सरकारी वकील घरत यांनी म्हटले आहे.