यावल येथे रमजान ईद उत्साहात साजरी

41a55544 04ce 4544 83cd 6f054d072251

यावल (प्रतिनिधी) शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाजाच्या वतीने आज (दि.५ जुन) रमजान ईद मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरातील अक्सानगर परिसरातील ईदगाह् मैदानावर सकाळी ९.०० वाजता मौलाना समिउल्ला अब्दुल कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लीम बांधवांनी सामुहीक नमाज पठन केले.

 

काल सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास चंद्रदर्शन झाल्यावर शहरातील बाजार पेठेत मुस्लीम बांधवांनी विविध प्रकारच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. आज सकाळपासून लहान मुला-मुलींपासुन तरूण ही सर्व नवनवीन आकर्षक वस्त्र परिधान करून महिनाभर उपवास रोजे ठेवणाऱ्या रोजेदारांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतांना दिसुन येत होते. ईदगाह मैदानावर नमाज पठनानंतर मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार जितेन्द्र कुंवर, पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे नगरसेवक प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादीचे विजय प्रेमचंद पाटील, माजी आमदार रमेशदादा चौधरी, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, कॉग्रेसचे भगतसिंग देवनाथ पाटील, प्रविण घोडके, शिवसेनेचे शरद कोळी, नगरसेवक अरलम शेख नबी, नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते, सामाजिक कार्यकर्ते धीरज महाजन, धीरज चौधरी, नगरसेवक मनोहर सोनवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाळे आदी सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content