Home धर्म-समाज उद्या पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे सामाजिक सलोखा वाढीसाठी रमजान ईफ्तार पार्टी

उद्या पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे सामाजिक सलोखा वाढीसाठी रमजान ईफ्तार पार्टी

0
47

ramadan hindi

पाचोरा (प्रतिनिधी ) पाचोरा पोलीस प्रशासच्या वतीने मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान निमित्त ईफ्तार पार्टीचे आयोजन सोमवार २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता स्टेट बँकजवळ व्ही.पी. रोड येथे करण्यात आले आहे.

ईफ्तार पार्टीचे आयोजन पाचोरा पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक पंकज शिंदे दत्तायंत्र नरवाडे याच्या सहकार्याने गोपनीय विभागातील प्रकाश सूर्यवंशी सुनील पाटील है करीत आहे. याप्रसंगी प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक हे असतील तर अध्यक्ष म्हणून आ. किशोर पाटील हे राहणार आहेत. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रशांत बच्छाव, पाचोरा उपपोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपनगराध्यक्ष शरद पाटे सर्व पक्षाचे नगरसेवक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मुस्लिम समाजाचे पदाधिकारी सर्व दैनिक साप्ताहिक व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थिती राहणार आहेत. या पार्टीत बहुसंख्येने मुस्लिम व हिंदू बांधव उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी केले.

 

 

 

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound