रामेश्वर कॉलनीत संशयितरित्या फिरणाऱ्यास अटक

aropi 1222

 

जळगाव प्रतिनिधी | रामेश्वर कॉलनी परिसरात 28 वर्षीय व्यक्ती अंधाराच्या आडोश्याला लपून संशयितरित्या फिरत असताना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्‍मण दशरथ बाविस्कर (वय 28) रा. चंदाभाई घोडेवाले यांच्या गल्ली, हा हॉटेल कस्तुरी जवळील उपासनी नगरात असलेल्या भिंतीच्या आडोशाला अंधारात लपत असल्याचे एमआयडीसी पोलिसांच्या निदर्शनास आला. त्याची चौकशी केल्यास त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. काहीतरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांना आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पो, का. गोविंद पाटील यांच्या फिर्यादीवरून कलम 122 प्रमाणे एमआयडीसीत नोंद करण्यात आली.

Protected Content