पाचोरा प्रतिनिधी । आखिल आदिवासी मीणा समाज महासभा या संघटनेचे संस्थापक नहारसिंग सत्तावन यांच्या आदेशानुसार कार्यकारिणी गठीत करण्यात आली. रमेश जोनवाळ यांची अखिल आदिवासी मीणा समाज महासभा संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आखिल आदिवासी मीणा समाज महासभा संघटनेचे महाराष्ट्र संघठन मजबूत करण्यासाठी रमेश जोनवाळ यांच्या आनुभवने व मार्गदर्शने सर्व जिल्ह्यातील गावा गावात शाखा सुरू करणार आहोत अशी माहिती दिली. त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सत्तवन, डाॅ.किरोडी लाल मिनाजी, भिमसिंग घुसिंगा, सुभाष डोभाळ संजय बालोद, दिपक डोभाळ, दिपक शेवाळ, कैलास टाटू, शंकर जोनवाळ, गोपाल चन्नावत, गोकुळ चेडवाळ यांनी निवडीबद्दल अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. जोनवाळ यांच्या निवडीबद्दल सर्वञ समाज बांधव यांनी अभिनंदन केले आहे.