कासोदा, ता.एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील उत्राण येथील रहिवासी रामदास पांडुरंग महाजन यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.
एरंडोल येथील पंचायत समितीचे उपसभापती अनिल रामदास महाजन व शरद रामदास महाजन यांचे वडील रामदास पांडूरंग महाजन यांचे वृद्धपकाळाने रात्री २:३०वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी तीन वाजता उत्राण येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.