नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपकडून राम शिंदे यांनी बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. तर राम शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार राम शिंदे यांच्या निवडीची घोषणा आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सभागृहात केली. त्यानंतर राम शिंदे हे त्यांच्या आसनाकडे जात असताना निलम गो-हे यांनी केलेल्या विधानामुळे विधानपरिषदेमध्ये हास्यकल्लोळ उडाला.
विधान परिषदेच्या सभापतीपदी प्रा.राम शंकर शिंदे यांची गुरुवारी आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी राम शिंदे यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्यबद्दल विरोधी पक्षाचा सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. मात्र उपसभापती निलम गो-हे यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच चेह-यावर हसू उमटले.