Home Cities मुक्ताईनगर अन् रक्षाताई खडसे झाल्या भावूक !

अन् रक्षाताई खडसे झाल्या भावूक !


rakshatai bjp
 

जळगाव (प्रतिनिधी) रावेर लोकसभेच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांचे प्रचाराचे नारळ आज कोथळी येथील श्री क्षेत्र मुक्ताई मंदिरात फोडण्यात आले. यावेळी जाहीर आयोजित जाहीर सभेला माजी मंत्री एकनाथराव खडसे उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी मुंबई येथून मोबाईलवरून सभेला संबोधित केले. दरम्यान, आपल्या भावना व्यक्त करतांना रक्षाताई खडसे भावूक झाल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले होते.

 

खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या भाषणात नाथाभाऊंवर मुंबईत उपचार सुरू असून त्यांच्या तपासण्या सुरू असल्याची माहिती आपल्या भाषणात दिली. यावेळी भावना व्यक्त करतांना खासदार रक्षाताई खडसे यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी रक्षाताई यांनी कार्यकर्त्यांना व मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार हरिभाऊ जावळे,आमदार चैनसुख संचेती जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आज मुक्ताईनगर येथे जोरदार रॅली देखील काढण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound