भुसावळ (प्रतिनिधी) मागील साडेचार वर्षांमध्ये झालेला विकास डोळ्यांपुढे ठेवून जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवण्यासाठी येत्या 23 एप्रिल रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाचे पर्व गतिमान ठेवण्यासाठी नवी ऊर्जा माझ्या पाठीशी उभी करा असे आवाहन, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. त्या आज यावल तालुक्यातील न्हावी येथे मतदारांशी संवाद साधत होत्या.
याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिराकाका चौधरी, नगराध्यक्षा महानंदाताई होले, माजी सभापती भरत महाजन, माजी नगराध्यक्ष होमराज चौधरी, शहराध्यक्ष संजय रल, यशवंत तळेले, महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.